सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
  • "विकासाच्या नावाखाली मतांची खरेदी" सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गुंडांकडून…रोहित पवारांचा प्रहार
  • रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं...; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी
  • निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर केला रद्द, पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी
  • राज्यात दूध भेसळीचा कहर, उकळी आणताच चक्क रबर तयार!
  • आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता! काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला, बिहारचाही आरसा दाखवला
  • ताजमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेल्याने महिलेला अपमानास्पद वागणूक, सलवार कमीज अन् मांडी घालून बसण्यावरूनही सुनावलं
 जिल्हा

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड.आशिष शेलार

डिजिटल पुणे    23-10-2025 11:20:36

मुंबई  : राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने दिवाळीच्या स्वागतासाठी “दीप उत्सव दिवाळी पहाट” हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आशा भोसले व सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अविस्मरणीय गीतांची स्वरमयी मैफल रंगली.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर आणि प्राजक्ता सातर्डेकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे होते.

या प्रसंगी आमदार मनोज कोटक, नगरसेवक प्रभाकर शिंदे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी तसेच नगरसेविका स्मिता कांबळे उपस्थित होते. मुलुंडकर रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


 Give Feedback



 जाहिराती