मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात आज, गुरुवारी सकाळी 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर' या उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती देण्यात आली. एस. व्ही. रोडवरील बेहरामपाडा येथील गांधी शाळेजवळ असलेल्या या उंच इमारतीला आग लागल्याचे समजताच परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या आगीला 'लेव्हल-२' चा कॉल म्हणून घोषित केले.
मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग लागली.. जोगेश्वरीतील जेएनएस बिझनेस सेंटर या उंच इमारतीला आज सकाळच्या सुमारास आग लागली. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सगळीकडे धुराचे लोट पसरे असून आग वाढतच चालली आहे. अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती आली नाही.
या घटनेची माहिती मिळताच एमएफबीची अनेक वाहने, स्थानिक पोलीस दल, १०८ रुग्णवाहिका, पीडब्ल्यूडी पथक, बीएमसीचे प्रभाग कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या सर्व एजन्सीजच्या मदतीने मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. सध्याच्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्यांची सुरक्षितपणे सुटका केली आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बीएमसी आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीचे कारण आणि या दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीचा पुढील तपास सुरू आहे.
इमारतीमध्ये ओसी नसताना पालिकेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. इमारतीमध्ये ओसी नसताना मोठा संख्येमध्ये लोकं भाड्याने गोदाम आणि दुकान घेऊन ते चाललत होते. पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या 16 ते 17 लोकांना या आगीमधून सुखरूप रेस्क्यू करण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. ओशिवरा पोलीस आग कशामुळे लागली, ओसी नसताना विकासकाने इमारतीमधील दुकान भाड्याने कशी दिली, त्याचसोबत यामध्ये पालिकेने का दुर्लक्ष केलं या संदर्भात अधिक तपास करत आहे.
जेएमएस बिझनेस पार्क इमारतीला OC नाही. ओसी नसताना सुद्धा इमारतीमध्ये लोकांना भाड्यावर दुकान दिला गेला. त्यामुळे ओशिवरा पोलीस आता डेव्हलपर वर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला इमारतीचा सातवा मजल्यावर आग लागली. नंतर आग वाढत सातवा, आठवा, नववा आणि दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत तीन फ्लोर जळून खाक झाले आहेत. 10 व्या मजल्यावरती अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले होतं, त्यांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात JMS बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीचा एका गाळ्यामध्ये ही मोठी आग लागली. मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता होती. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.