मुंबई : केंद्रीय दक्षता आयोगामार्फत २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५ देशभर साजरा करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार हा विकासकामातील सर्वात मोठा अडथळा आहे. समाजाचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम केवळ आठवड्यापुरते न राबविता नियमित सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास, त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे संपर्क साधावा. किंवा संपर्क क्रमांक. 24921212, टोल फ्री क्रमांक 1064, व्हाट्सअप क्रमांक – 8828241064, तसेच [email protected]” या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
नागरिक, सरकारी-खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी केले आहे.