सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 जिल्हा

कामठा येथील चिंतामणी बाल युवक मंडळाने साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती;शिवरायांच्या या मावळ्यांचे सर्वत्र कौतुक

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    25-10-2025 13:58:52

उरण : श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून गोर गरीब कष्टकरी जनतेची जुलमी राजवटीतुन मुक्तता केली. एक आदर्श लोकशाही राज्य निर्माण केले. आदर्श राज्य आदर्श लोकशाही व्यवस्था कशी असते याचे उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कार्य कोणीही कधीही विसरणार नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याने प्रभावित झालेल्या उरण शहरातील कामठा येथील चिंतामणी अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये चिंतामणी बाल युवक मंडळाने दिवाळी सणाचे औचित्य साधून कोकणातील परंपरा जपत माती व विविध साहित्याचा वापर करून शिवनेरी किल्ला बांधला आहे.

या मंडळाच्या बाळगोपाळानी हुबेहूब शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. या बालकांची या गड किल्ले सजावट व बांधणीच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य व विचारा विषयी अत्यंत निष्ठा प्रेम आस्था दिसून आली. चिंतामणी बाल युवक मंडळ कामठा तर्फे दिवाळी मध्ये दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारली जाते. यंदा शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली गेली आहे. गेली १० वर्षे या मंडळाचे बाळगोपाळ, कार्यकर्ते हे गड किल्ले बांधत आहेत. यंदाचे हे ११ वे वर्षे आहे. या सर्व मावळ्यांनी गड किल्ले बांधून स्वराज्याप्रती व महाराजांच्या प्रती आपली निष्ठा दाखवली आहे. सदर बांधलेला किल्ला अत्यंत सुंदर व आकर्षक आहे. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा असल्याने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी बांधलेल्या किल्ल्याचे व चिंतामणी बाल युवक मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे कौतुक केले आहे.

सदर किल्ला बांधण्यासाठी चिंतामणी बाल युवक मंडळाचे सदस्य- रोहित राठोड, इशान सामंता, आर्य म्हात्रे, शुभम पोरे, मयंक शेट्टे, सयान मन्सुरी, गणेश राठोड, क्रीयांश पोरे, अयान इब्राहिम, ओमकार गुरुव, उपासना गुरुव, रोहित निचिते, साकिब बेग,वाहील मलिक यांनी रात्रंदिवस विशेष मेहनत घेतली आहे.या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आई वडील व कुटुंबियांचाही यात महत्वाचा वाटा आहे. आई वडील व कुटुंबियांचे मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यातून मुलांनी हा गड किल्ला साकारला आहे.शिवनेरी किल्ल्याचे हुबेहूब प्रतिकृती असलेला सदर गड किल्ला आकर्षक व सुंदर असल्याने अनेक रसिक प्रेषक, शिवप्रेमी, नागरिक हा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती