पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस,पुणे कॅम्प)मध्ये १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.संस्थेच्या अध्यक्ष तसेच महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा पी.इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे सचिव इरफान शेख, डॉ.एन.वाय.काझी,डॉ.नाझीम शेख,इफ्तेकार इनामदार,अफझल खान,मशकूर शेख,असिफ शेख,मुश्ताक पटेल,सादिक लूकडे,डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे अधिकारी वर्ग,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी,विश्वस्त,प्राचार्य,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.आबेदा पी.इनामदार यांनी महाराष्ट्र दिन,कामगार दिनामागची पार्श्वभूमी सांगून सर्वांच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.