पुणे : दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ज्ञानदीप फाउंडेशन धायरी यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला ध्वजारोहण करून राष्ट्रगीत, महाराष्ट् गीत घेण्यात आले त्यानंतर विविध क्षेत्रातील कामगारांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यामध्ये मनपा पुणे ,तळेगाव डेपो, एसटी डेपो,सी डब्ल्यू पी आर एस, खडकी डेपो , व महावितरण येथील कामगारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानदीप फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नामदेवराव भुरूक यांनी केले यावेळी सिद्धी पोकळे हिचा एमबीबीएस झाल्याबद्दल सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक काकासाहेब चव्हाण ,गुलाब पोकळे सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास कुंभार, दिलीप रायकर,तानाजी कांबळे, दिनेश कुंभार, ॲड राजेंद्र मिन्डे ॲड राजेंद्र भुरूक,किशोर पोकळे, याचबरोबर प्रमोद रायकर, तुषार पोकळे, वस्ताद सुभाष पोकळे ,रमेश चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थ व नागरिक , मोठ्या संख्येने उपस्थित होते