सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 DIGITAL PUNE NEWS

‘राजा शिवाजी’वर प्रेक्षकांचा वर्षाव; रितेश देशमुखची खास विनंती – “कृपया व्हिडिओ शेअर करू नका”

डिजिटल पुणे    02-05-2026 18:04:15

मुंबई :अभिनेता रितेश देशमुख याचा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी १ मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सुमारे ११.३५ कोटींची कमाई नोंदवली आहे.

चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन प्रेक्षकांकडून थिएटरमध्ये शूट करून सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याचे लक्षात येताच रितेश देशमुखने एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली आहे. “तुमचा उत्साह आणि प्रेम आम्हाला समजते, पण कृपया सिनेमातील दृश्यांचे व्हिडिओ पोस्ट करू नका,” असे आवाहन त्याने केले.

तो पुढे म्हणाला की, चित्रपटात काही सरप्राईज घटक आहेत आणि जे प्रेक्षक अद्याप सिनेमा पाहायला आलेले नाहीत, त्यांच्यासाठी तो अनुभव तसाच राहू द्यावा. “सगळ्यांना चित्रपटाचा पूर्ण आनंद घेऊ द्या,” असे सांगत त्याने प्रेक्षकांचे आभारही मानले.

दरम्यान, सोशल मीडियावर रितेशच्या या विनंतीला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, “जय शिवराय”च्या घोषणांसह चित्रपटाबद्दलचा उत्साह अधिकच वाढताना दिसत आहे. विकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती