सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 शहर

पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरू पडताळणी मोहीम; नियमभंग करणाऱ्या 38 घरमालकांवर गुन्हे

अजिंक्य स्वामी    04-05-2026 11:10:31

पिंपरी-चिंचवड : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी भाडेकरू पडताळणीची विशेष मोहीम राबवली असून, या कारवाईदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या 38 घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पथकांनी विविध भागांत तपास मोहीम राबवून भाडेकरूंची माहिती पडताळली. यावेळी अनेक घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात नोंदवलेली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा घरमालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

या मोहिमेचा उद्देश शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे हा असून, विशेषतः खोट्या कागदपत्रांवर राहणाऱ्या आणि परप्रांतीय तसेच परदेशी नागरिकांची माहिती पडताळण्यावर भर देण्यात आला. पोलिसांनी काही ठिकाणी संशयास्पद हालचालींचीही नोंद घेत तपास सुरू ठेवला आहे.

पोलिस प्रशासनाने सर्व घरमालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, भाडेकरू ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या कारवाईमुळे शहरात भाडेकरू नोंदणीबाबत जागरूकता वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती