सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 राजकारण

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    04-05-2026 12:34:00

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून निकाल हळूहळू स्पष्ट होत आहे. नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल 78 हजार 528 मतांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी वाढत असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

निकालाची दिशा स्पष्ट होत असतानाच सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते,” असे त्या म्हणाल्या. निकाल जाहीर होत असताना अजित पवार यांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत, “या विजयाचा जल्लोष म्हणून मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया,” असे स्पष्ट केले.तसेच, “अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांची मनःपूर्वक आभारी आहे. हा शेवट नसून नव्या वाटचालीची सुरुवात आहे,” असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, बारामतीत एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 2019 मध्ये अजित पवार यांनी 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याने विजय मिळवत विक्रम केला होता. यंदा हा विक्रम मोडण्यासाठी 1 लाख 65 हजार 266 मतांचा टप्पा गाठावा लागणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती