सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 शहर

'अमृतघन' सांगीतिक कार्यक्रमाचे ९ मे रोजी आयोजन

डिजिटल पुणे    04-05-2026 14:11:28

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘अमृतघन’ हा सांगीतिक  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे  होणार आहे.या कार्यक्रमात प्रख्यात गायिका लता मंगेशकर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर ,संगीतकार सुधीर फडके यांची गीते रसिकांना अनुभवता येणार आहेत. कार्यक्रमात प्रणव कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी आणि पूजा महामुनी  हे गायक सहभागी होणार असून त्यांना वैभव केसकर, श्रीधर मोडक आणि निषाद शिधये यांची साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन अक्षय वाटवे करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  सादर होणारा हा  २९० वा कार्यक्रम आहे.प्रवेश विनामूल्य असून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे.          


 Give Feedback



 जाहिराती