सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 शहर

कात्रज येथील श्री विश्वकर्मा मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

गजानन मेनकुदळे    04-05-2026 14:55:27

पुणे, कात्रज – कात्रज परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिराचा कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्याने संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. काटेकोर नियोजन, समर्पित कार्यपद्धती आणि एकजुटीमुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. तसेच, विविध देणगीदारांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे या सोहळ्याला अधिक भव्यता प्राप्त झाली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. आमदार भीमराव आण्णा तापकीर, नगरसेवक रोहिदास बाप्पू चोरघे, नगरसेवक अरुणभाऊ राजवाडे, माजी नगरसेवक राजाभाऊ कदम, युवा नेतृत्व स्वराज भैय्या बाबर, युवा उद्योजक अखिलभाऊ नायर, अजयभाऊ कपिले, माजी उपसरपंच गणेशशेठ काळे, उद्योजक पप्पूशेठ गुजर, युवा उद्योजक अनिल पिंटूभाऊ चोरघे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन बदक आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

याशिवाय, मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांच्या उपस्थितीमुळे सोहळा अधिक आनंदमय आणि संस्मरणीय ठरला.कार्यक्रमादरम्यान धार्मिक विधी, पूजन आणि पारंपरिक पद्धतीने कलशारोहण करण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या पवित्र सोहळ्यात सहभाग घेतला.या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून सहकार्य, शुभेच्छा व आशीर्वाद दिल्याबद्दल मंदिर संस्थेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती