सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 क्राईम

नसरापूर प्रकरण: आरोपीच्या पत्नीचा संताप; “त्याला जिवंत जाळा, मला त्याचं तोंडही पाहायचं नाही”

डिजिटल पुणे    05-05-2026 12:00:02

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सर्व स्तरातून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या. आरोपीच्या मुलाने आपल्या वडिलांविषयी संताप व्यक्त करत, “असा बाप असल्याची लाज वाटते. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी केली.

दरम्यान, आरोपीच्या पत्नीनेही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. “मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याला जिवंत जाळलं पाहिजे. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला सांगू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. तसेच, “त्या निष्पाप मुलीच्या आईवर काय बीतत असेल याची मला जाणीव आहे. मीही एक आई आहे. या घटनेनंतर माझ्या घशाखाली अन्नाचा घासही उतरलेला नाही,” असेही त्यांनी सांगितले.पत्नीने पुढे स्पष्ट केले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे आरोपीसोबत कोणतेही संबंध नव्हते. “आम्ही त्याला सुधारण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण त्याने नेहमी आम्हाला दूर लोटलं,” असे त्यांनी नमूद केले.

घटनेचा तपशील:

१ मे रोजी सुट्टीसाठी आजीकडे आलेली चार वर्षांची मुलगी अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह लपवून आरोपीने पळ काढला. मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या अमानुष घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती