सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 शहर

कात्रज-जांभुळवाडीत थरारक घटना; दोन भिंतींमध्ये अडकलेल्या ७ वर्षीय मुलाची जवानांकडून सुखरूप सुटका

डिजिटल पुणे    06-05-2026 17:36:12

पुणे :पुण्यातील कात्रज परिसरातील जांभुळवाडी येथे मंगळवारी दुपारी एक धक्कादायक आणि तणावपूर्ण प्रसंग घडला. खेळताना सात वर्षांचा मुलगा दोन भिंतींमधील अतिशय अरुंद जागेत अडकला. घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली.

माहिती मिळताच पीएमआरडीए, पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जागा अतिशय अरुंद आणि धोकादायक असल्यामुळे बचावकार्य मोठे आव्हान ठरत होते.

जवानांनी संयम आणि कौशल्य दाखवत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने भिंतीचा काही भाग काळजीपूर्वक तोडला. घन, बोल्ट कटर आणि हायड्रॉलिक ब्रेकरचा वापर करत त्यांनी अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार केला.

काही काळ सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर मुलाची सुरक्षित सुटका करण्यात जवानांना यश आले. या वेळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले.

सुदैवाने या घटनेत मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक तपासणीसाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळेवर झालेल्या बचावकार्यातून मोठी दुर्घटना टळली.


 Give Feedback



 जाहिराती