सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 जिल्हा

इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार ;सिटी स्कॅन, एमआरआय व रक्तपेढी सुविधा लवकरच सुरू करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

डिजिटल पुणे    07-05-2026 12:25:52

मुंबई :  इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे ३०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबत शासन सकारात्मक असून, अत्याधुनिक आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय, रक्तपेढी तसेच प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई येथील आरोग्य सेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कामकाज व सोयीसुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार राहुल आवाडे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, कोल्हापूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक  डॉ. दिलीप माने उपस्थित होते.

या वेळी आरोग्यमंत्र्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या रुग्णालयात जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली  महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.या बैठकीत परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाला मंजुरी देणे, एसटीपी/ईटीपी प्रकल्प कार्यान्वित करणे, रुग्णालयाचे श्रेणीवर्धन,  अस्थायी पदांचे स्थायी पदात रूपांतर, औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

रुग्णालयात डायलिसिस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यासोबतच रुग्णालय परिसरात वैद्यकीय अधिकारी व रुग्णांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारणे, इमारतीचे इलेक्ट्रिक, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करणे, सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणे तसेच इलेक्ट्रिक 108 ॲम्ब्युलन्स सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.इचलकरंजी व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.


 Give Feedback



 जाहिराती