सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 शहर

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा (डीपीयु) 17 वा पदवीप्रदान समारंभ येत्या शनिवारी, 9 मे रोजी संपन्न होणार आहे

डिजिटल पुणे    07-05-2026 14:07:00

पिंपरी/ पुणे - डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी, दि. 9 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभासाठी मा. श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधिया, केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री, भारत सरकार हे पाहुणे म्हणून  उपस्थित असतील.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. पी. डी. पाटील कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे हे भूषविणार आहेत.

या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे  आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे तसेच मा. डॉ. ए. एल. काकराणी  वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात प्राध्यापक तसेच संचालक - शैक्षणिक सहयोग विभाग डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे. या दोन दिग्गज व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.

या समारंभात विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 18,720 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 48 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 16,752 पदव्युत्तर पदवी, 1,905 पदवी व 15 पदविका या अशा एकूण 9 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.

यावेळी मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे),   मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील (प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे), मा. डॉ. एन. जे. पवार (कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे),  मा. डॉ. सौ. स्मिता जाधव (प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) तसेच  मा. डॉ. यशराज पी. पाटील (विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक सदस्य, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपण पाहू शकता अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांनी दिली आहे. https://www.dpu.edu.in/live   


 Give Feedback



 जाहिराती