सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 शहर

आंबेगावात उष्माघाताचा संशय; कांदा काढणीदरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू

डिजिटल पुणे    09-05-2026 17:57:28

पुणे : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असतानाच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदा काढणीच्या कामात गुंतलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नकुशा बाळू सुपे (वय 33) या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या कांदा काढणीच्या मजुरीसाठी आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे आल्या होत्या. दुपारच्या वेळी शेतात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या.

घटनेनंतर सहकारी मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात काम करणाऱ्यांनी पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती