सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 शहर

ग्रो बिझनेस नेटवर्कची “आभा” ही परस्पर महा संपर्क परिषद संपन्न

डिजिटल पुणे    12-05-2026 16:04:14

पुणे : उद्योजकांनी एकमेकांना मदत करून आपला उद्योग-व्यवसाय वाढवावा यासाठी स्थापन झालेल्या जीबीएन- ग्रो बिझनेस नेटवर्क संस्थेची परस्परांशी महासंपर्क व्हावा यासाठी आयोजित “आभा” ही महासंपर्क परिषद संपन्न झाली. हॉटेल क्लार्क इन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १३८ उद्योजकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रम प्रसंगी जीबीएनचे संस्थापक विक्रांत गोखले, रिजनल हेड पुणे व पीसीएमसी गौरी जोशी, झोनल हेड नागेश जोशी, संजय महाजन, व उमेश मुळे,डेप्युटी रिजनल हेड अमेय इंगळे, कोल्हापूर डेप्युटी रिजनल हेड नयन सोळंकुरे व कोअर कमिटी टिम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना विक्रांत गोखले यांनी “या कार्यक्रमात उद्घाटन – पाहुणे भाषणे या ऐवजी फक्त १ टू १ म्हणजे एकमेकाशी संपर्क करण्यात आला. सर्वाची  एकमेकांच्या उद्योग व्यवसायाविषयी सखोल माहितीची देवाण घेवाण झाली, महत्वाचे म्हणजे प्रत्येक उद्योजकाला १०० हून अधिक उद्योजकांशी प्रत्यक्ष बोलता आले व माहितीची देवाणघेवाण करण्यात आली हे अतिचय दुर्मिळ काम झाले. यामुळे उद्योग व्यवसाय वाढीस चालना मिळेल” असे सांगितले.  

 


 Give Feedback



 जाहिराती