सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 क्राईम

NEET पेपरफुटी प्रकरणात पुणे कनेक्शन समोर; ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात

डिजिटल पुणे    13-05-2026 15:58:48

पुणे : देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आले असून पुणे गुन्हे शाखेने एका 46 वर्षीय महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही महिला बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव असून तिने विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींपर्यंत पोहोचविण्यात मध्यस्थी केल्याचा संशय आहे. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला मदत केल्याचाही आरोप तिच्यावर आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला असून काही व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि मेसेजेसच्या आधारे दोघांमधील संपर्क असल्याचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही महिला आणि धनंजय लोखंडे हे काही विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचाही संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नाशिकमधील संशयित शुभम खैरनार याला सीबीआयने ताब्यात घेतले असून त्याला मुंबईकडे नेण्यात आले आहे. या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणातही तपास सुरू केला आहे.या संपूर्ण प्रकरणात NEET पेपर लीक 10 ते 15 लाख रुपयांत विक्री झाल्याचा गंभीर आरोप असून सीबीआय तपासाला वेग आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती