सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 शहर

माऊलींच्या पालखीचे ८ जुलैला प्रस्थान; आळंदी देवस्थानाकडून कार्यक्रम जाहीर

डिजिटल पुणे    14-05-2026 11:08:20

आळंदी : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाकडून पालखी सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा पालखी सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार असून, प्रवासादरम्यान तीन उभे रिंगण आणि चार गोल रिंगण होणार आहेत. पुणे आणि सासवड येथे प्रत्येकी दोन दिवस मुक्काम असणार आहे.

देवस्थानाच्या माहितीनुसार, पालखी सोहळा ८ ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे. विविध गावांमध्ये मुक्काम आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण आहे.

सोहळ्यातील प्रमुख रिंगण :

पहिले उभे रिंगण : चांदोबाचा लिंब (१९ जुलै)

पहिले गोल रिंगण : पुणे (२० जुलै)

दुसरे गोल रिंगण : खुडूस फाटा (२२ जुलै)

तिसरे गोल रिंगण : वाखरीबुवाची समाधी (२३ जुलै)

चौथे गोल रिंगण : वाखरीतील विठ्ठल मंदिर (२३ जुलै)

दुसरे उभे रिंगण : धावडी, पंढरपूर (२४ जुलै)

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि देवस्थान समितीकडून आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे. लाखो वारकरी यंदाही “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती