सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 क्राईम

जनगणनेच्या कामावर गेलेल्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला; स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    29-05-2026 18:21:58

पुणे : पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला काही जणांनी शिवीगाळ करत दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुणे महानगरपालिकेत कार्यरत असून सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी त्या परिसरात गेल्या होत्या. 27 मे रोजी दुपारी मीनाताई ठाकरे वसाहतीत सर्वेक्षण सुरू असताना काही स्थानिकांनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत वाद घातला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली.

यानंतर दुसऱ्या दिवशी महिला कर्मचारी पुन्हा त्या भागात जनगणनेच्या कामासाठी गेल्या असता, मागील वादाच्या रागातून काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधितांनी त्यांच्या पाठीमागून येत दगडाने मारहाण केली तसेच लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली.

या प्रकरणात विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लीलावती मोरे, अभिजीत मोरे आणि इतर काही अनोळखी महिला व पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती