सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 शहर

भारतीय विद्या भवनमध्ये ‘सुरोंके रंग,कबीरके संग’ भजन मैफल ६ जून रोजी

डिजिटल पुणे    02-06-2026 14:20:27

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित मुकुंद अनंत मराठे यांच्या ‘सुरोंके रंग,कबीरके संग’ या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार,दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे  सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता,पुणे येथे  होणार आहे.

महेश जोशी आणि संदीप जोशी (सहगायन), पं.रामकृष्ण उर्फ प्रसाद करंबेळकर( तबला),पं.मुकुंद पेटकर(हार्मोनियम),मनोहर अत्रे (तालवाद्य) हे  साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद नानिवडेकर करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २९४ वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.कबीरांच्या रचनांवर आधारित भजनांचा हा कार्यक्रम   शास्त्रीय रागांच्या चौकटीत सादर होणार असून रसिकांना अध्यात्म, भक्ती आणि संगीत यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती