सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
 क्राईम

पुण्यात खळबळ! सहकारनगरात भररस्त्यात गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून तरुणावर तीन फैरी

डिजिटल पुणे    11-06-2026 12:52:22

पुणे : शहरातील सहकारनगर परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. शिंदे हायस्कूल परिसरातील एका मेडिकल स्टोअरसमोर उभ्या असलेल्या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणामागे जुने वाद आणि पूर्वीचे वैमनस्य कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेमुळे सहकारनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती