सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • विवरणपत्रासाठी मुदतवाढ नाही, प्राप्तीकर विभागाचा खुलासा ,३१ तारीखच अंतिम
  • मराठा आंदोलक संभाजीनगर मधे शरद पवारांच्या भेटीला
  • राष्ट्रपतीचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर
  • नाशिक मधे धावत्या स्कूटीवर झाड पडले
  • पुण्यातील एकता नगर मधील वीज पुरवठा सुरळीत ,काल रात्रीपासून बंद होता वीज पुरवठा
  • चिपळूण मधे थेट रस्त्यावर आली मगर
  • मनसे लढविणार २२५ /२५० जागा
  • पाणी सोडण्याबाबत विभागाकडून योग्य त्या सूचना : चंद्रकांत पाटील
  • धरण भरल्यास पाणी सोडव लागत: चंद्रकांत पाटील
  • मुरलीधर मोहोळ आज सकाळी करणार पुण्यातील सिंहगड रोड पूरग्रस्त भागाची पाहणी
  • आज २५ वा कारगील विजय दिवस
  • मुरलीधर मोहोळ यांनी केली पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
 जिल्हा

फेक फेसबुक अकाउंटवरून होणाऱ्या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांनी नागरिकांना दिल्या सूचना

पुजा    27-03-2024 14:28:36

पुणे : सध्या पुणे शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, व्यावसायीक, शासकीय अधिकारी/कर्मचारी व इतर नामवंत व्यक्तींचे फेक फेसबुक अकाउंट बनवुन त्यांचे फ्रेंड लिस्ट मधील मित्र-मैत्रीण तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठ्युन त्यानंतर पैशाची मागणी करीत असले बाबत सायबर पोलिस स्टेशन येथे तकारी प्राप्त होत आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले. त्यासोबतच असे आपणासोबत घडल्यास आपण खालील प्रमाणे प्रोसेस करून सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असे आवाहन देखील केले आहे. 

ज्यांची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरुन बनवलेली फेक प्रोफाईल शोधा, स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडुन सदर फेक प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवुन घ्या, त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.

तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. Pretending To be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity. आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना :

प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा. तुमच्यासमोर Find Support Or Report हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. Fake Account हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity. आपण मित्राची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यांपैकी A Friend हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

फेसबुक प्रोफाईल सुरक्षीत कसे करावे?

स्वतःची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसु नये याकरीता... Settings & Privacy → Setting → How People Can Find And Contact You Who Can See Your Friend List तिथे Only Me करावे.

स्वतःची फेसबुक प्रोफाईल फोटो/कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्ती Copy/Download करू नये याकरीता

Settings & Privacy Setting Profile Locking Lock Your Profile तिथे करावे.

अनोळखी व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठयु नये याकरीता

Settings & Privacy Setting How People Can Find And Contact You → Who Can Send Friend Request तिथे Friend Of Fraind करावे.

स्वतःचा फेसबुक अकाउंट सुरक्षीत ठेवणे करीता

Settings & Privacy Setting Pasword and Security Use Two-Factor Authentication तिथे योग्य पर्याय निवडून Continue वर क्लिक करावे.

स्वतःचा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला ई-मेल आयडी कोणास दिसु नये याकरिता

Settings & Privacy Setting Parsnal and Account information Contact Info. तेथे नमूद मेल आयडी वर क्लिक करा

who can see your Email Address ? तिथे Only Me करावे.

स्वतः वा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला मोबाईल कमांक कोणास दिसु नये याकरीता

Settings & Privacy Setting Parsnal and Account information Contact info. तेथे Who Can See This Mumber ? तिथे Only Me करावे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती