सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

असलम इसाक बागवान यांचा १ मे पासून सायकल वरून प्रचार

डिजिटल पुणे    30-04-2024 11:35:58

पुणे : ओबीसी बहुजन पार्टीचे पुरस्कृत उमेदवार तथा लोकसेना पार्टीचे अधिकृत उमेदवार असलम इसाक बागवान( शिरूर लोकसभा मतदारसंघ,) यांच्या प्रचाराची सुरूवात दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या दिवशी होत आहे. बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.  

येत्या दहा दिवसात असलम इसाक बागवान हे हडपसर,आळंदी,भोसरी, राजगुरूनगर,मंचर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर,न्हावरे, शिक्रापूर, वाघोली केशनंद,मांजरी,ससाणे नगर, सय्यद नगर, महंमदवाडी,उंड्री,पिसोळी एनआयबीएम ,कौसरबाग, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, मिठानगर इत्यादी ठिकाणी   सायकलवरून प्रचार करणार आहेत. 

प्रचारादरम्यान ते लोकशाही  मूल्य ,प्रस्थापिताचे राजकारण, घराणेशाही, सरंजामशाही,भांडवलशाही यावर  वाचा फोडणार आहेत.त्यांची निशाणी शिट्टी  आहे.'सर्व अल्पसंख्याक,दलित,ओबिसी,वंचित यांनी या प्रचारामध्ये सहभागी व्हावे',असे आवाहन असलम इसाक बागवान यांनी केले आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती