सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन

MSK    02-05-2024 10:08:17

पुणे  : अण्णासाहेब आगर महाविद्यालय मधील रसायनशास्त्र विभागाने एम.एस.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन केले होते. यामध्ये दोन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक 24 एप्रिल रोजी Evolves Pvt. Ltd. Pune आणि दिनांक 30 एप्रिल रोजी Indus Biotech Ltd. Lonand या दोन कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे आणि रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. लतेश निकम यांच्या यांच्या हस्ते झाले.

Campus interview आयोजित करण्यामागचे उद्दिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानंतर करियर कडे पहिलं पाऊल टाकण्यासाठी एक छोटी मदत. त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी वाटचाल करावी.ज्ञानाची शिदोरी व माहितीचं भांडार घेऊन विदयार्थ्यांनी आयुष्यातील निर्णायक टप्पा यशस्वीपणे पार पाडवा.

या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  नितीन घोरपडे , रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. लतेश निकम आणि विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्लेसमेंट ड्राईव्ह साठी विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला या प्रसंगी बाहेरील महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. प्लेसमेंट ड्राईव्ह चे समन्वयक म्हणून प्रा. शितल जगताप आणि प्रा. महेश शिंदे यांनी काम पाहिले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती