सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

MSK    02-05-2024 10:10:13

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे महाराष्ट्र दिन व कामगार दिना बद्दल माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत व समाजसुधारक, योगदान असल्याचे त्यांनी सांगून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.डॉ. शुभांगी औटी, प्रा.नितीन लगड, प्रा. मधुमंजिरी ओक, प्रा. प्रियांका लांडगे, प्रा.अपूर्वा बनकर, ऋतुजा आबनवे, गौरी मोरे आणि श्रावणी पवार यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. 

या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, प्रा. प्रीतम ओव्हाळ, प्रा. अनिल दाहोत्रे, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे तसेच  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल दाहोत्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती