सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार,अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी : मुरलीधर मोहोळ

MSK    03-05-2024 19:37:38

पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार,अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी : मुरलीधर मोहोळ

 

आगामी 20 वर्षांचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याने पुण्याची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

 

खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी खासदार संजय काकडे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, मुकेश गवळी, आनंद छाजेड, कार्तिकी हिवरकर, दुर्योधन भातकर, विजय वेल्हेकर, हर्षद बोडके, प्रविण गायकवाड, धर्मेश शहा, नितिन शिंदे, डॉ. अजय दुधाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, शहरातील पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी आणि हडपसर स्थानकांचा गेल्या दहा वर्षांत प्रवासीकेंद्रीत विकास करण्यात आला आहे. त्यातील पुणे स्थानकावर एकूण 6 फलाट असून, दररोज 72 रेल्वे गाड्या सुटतात व लोकलच्या 41 फेऱ्या होतात. दररोजची प्रवासी संख्या दीड लाख इतकी आहे. 750 मीटर लांबीचे नवीन चार आणि लोकलसाठी 600 मीटर लांबीचे नवीन दोन फलाट बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याहून 300 रेल्वे धावतील आणि दररोजची प्रवासी संख्या तीन लाख इतकी होऊ शकेल.

 

मोहोळ पुढे म्हणाले, मोदी सरकारने पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे प्रमुख स्थानक म्हणून केला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेने जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडीदरम्यानचा सर्व्हे सुरू असून, पुणे ते लोणावळादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. सर्व रेल्वे स्थानकांवरील विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करेन.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती