सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 जिल्हा

सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा; नेहा हिरेमठ च्या मारेकऱ्याला फाशी द्या,मोर्चात महिलांची मागणी

डिजिटल पुणे    04-05-2024 10:53:42

सोलापूर : कर्नाटकातील नेहा हिरेमठ हिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, नेहाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा घटना होऊ नये यासाठी कडक कायदे करण्याची मागणी करत सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढला.

कॉलेज आवारात हत्या

कर्नाटक राज्यात 18 एप्रिल अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. एकतर्फी प्रेमातून काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजच्या आवारात भर दिवसा हत्या करण्यात आली. प्रपोझ केल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने रागावून 24 वर्षीय मुलाने विद्यार्थ्यीनीची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ही तरुणी एमसीएची (MCA) विद्यार्थिनी होती. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लिंगायत समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला होता.सौंदत्ती (कर्नाटक) या ठिकाणी नेहा हिरेमठ हिची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. त्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चास मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रारंभ झाला. तेथून हा मोर्चा पंजाब तालीम, चौपाड, शिंदे चौक, लकी चौक, मार्गे हुतात्मा पुतळा चौक येथे आले. तेथून या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

हिंदू संघटना आक्रमक

नेहा ही हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती, 18 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी फयाजला अटक केली आहे. दरम्यान, फयाज हा तरुणीचा जुना वर्ग मित्र होता, फयाजला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. 

दरम्यान, यावेळी तेथील सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. नेहाच्या कुटुंबीयाच्या जिवाला धोका आहे. यामुळे त्यांना पोलिस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी सुधीर बहिरवाडे यांनी केली. यावेळी युवराज सरवदे, अक्षय वायकर, कंदलगावकर, अभिजीत जाधव, सिध्देश्वर पाटील, प्रवीण सरवदे आदींनी मोर्चासाठी नियोजन केले. या मोर्चात सकल हिंदू संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
Rahul jangam
 05-05-2024 18:56:16

सदर घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण विशिष्ठ जातीच्या स्री बळी पडली की तोच समाज विरोध करतो. तसे न करता सर्व समाजातील लोकांनी जाती भेद विसरून निषेध केला पाहिजे

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती