सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

संजय राऊत माझा छळ करत आहेत; निवडणुकीच्या काळात कोणी केले गंभीर आरोप?

डिजिटल पुणे    04-05-2024 15:58:55

मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही दुसऱ्या बाजूला राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे  यांनी खासदार संजय राऊत यांना धारेवर धरले आहे. नुकतेच निलम गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे निवेदन वाचून दाखवले. ज्या निवेदनात संजय राऊतांवर स्वप्ना पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवेदनात काय लिहिले आहे??

स्वप्ना पाटकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी स्वप्ना पाटकर माझ्या आईसोबत सांताक्रुझ येथे राहते. संजय राऊत माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहेत. मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग होतो. 3 मे ला देखील माझा BKC येथे पाठलाग झाला. याआधी देखील माझ्यावर हल्ला झाला आहे. संजय राऊत यांच्या गुन्हा दाखल आहे पण अजून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्टार गुप्तहेर नेमले आहेत. यातील एका अटक झाली असली तरी संजय राऊतांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

तसेच, “संजय राऊत यांनी व्यंकटेशची हत्या केली असू शकते. संजय राऊत यांनी मला धमकी दिली शिवीगाळ केली पण तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल असूनही संजय राऊत यांना पोलीस ठाण्यात बोलवले जात नाही. मला दुबई आणि पाकिस्तान येथून धमकीचे कॉल आले. गाडीवर हल्ला झाला. संजय राऊत यांनी मला वारंवार लज्जित केले आहे. संजय राऊत यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी पोलिसांनी मला त्रास दिला.” असे स्वप्ना पाटकर यांनी निवेदनात म्हटले असल्याची माहिती निलम गोरे यांनी दिली आहे.

नेमके प्रकरण काय?

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणांमध्ये स्वप्ना पाटकर यांनी मोठे खुलासे केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली असल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणामुळे स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी IPC च्या कलम 509, 506 आणि 504 अन्वये संजय राऊत यांच्या विरोधात FIR दाखल केली होती.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती