सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये लावली हजेरी !

डिजिटल पुणे    04-05-2024 16:40:37

बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

“मी परभणीतून खासदार झालो आहे आणि केंद्रात मंत्रीदेखील होणार आहे. सगळ्या विकास कामांसाठी निधी आणणार आहे. अजित पवारांनी माझा प्रचार केला आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे. त्यासोबतच मी एकदिवस पंतप्रधान होणार आहे”, असंही जानकर म्हणाले आहे.

“माझी परभणीची निवडणूक झाली म्हणून मी बारामतीत आलो आहे. अजितदादांनी मला तिकीट दिले तिकडे माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे. बारामतीतील सगळं मला माहिती आहे. गावागावात फिरलो आहे. त्यामुळे बारामती काही माझ्यासाठी नवीन नाही. बारामतीनं मला राष्ट्रीय नेता केला”, असं महादेव जानकर म्हणाले आहेत. “बारामतीकरांनी माझ्यावर खूप प्रेम दिलं आहे. आता बारामतीकरांना सुनेत्रा वहिनींना मतदान करा. सुनेत्रा पवार जिंकून येणं हे माझ्यादेखील प्रतिष्ठेची आहे”, असे महादेव जानकर म्हणाले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती