सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम ; व्हायोलिन आणि हार्मोनिअम च्या 'आनंद तरंग' मधे रसिक मंत्रमुग्ध !

डिजिटल पुणे    05-05-2024 10:39:01

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ' आनंद तरंग ' या गाण्यांच्या सहवादनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन दि.४ मे  २०२४ रोजी   करण्यात आले होते.'स्वरगंध,पुणे'प्रस्तुत या कार्यक्रमात डॉ.नीलिमा राडकर या व्हायोलिनमधून आणि माधवी करंदीकर यांनी हार्मोनियममधून शास्त्रीय संगीतावर आधारित सुप्रसिद्ध चित्रपटगीते , भावगीते सहवादनातून सादर केली, आणि रसिक मंत्रमुग्ध झाले !रवींद्र क्षीरसागर,जितेंद्र पावगी(तबला),नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी  साथसंगत केली. यशश्री पुणेकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात 'तुज मागतो मी आता ' या यमन रागातील गणेश स्तवनाने करण्यात आली. यानंतर चितचोर चित्रपटातील 'जब दीप जले 'यमन रागातील  'जा रे बदरा बैरी जा ,' दिवसामागुनी दिवस '  हे  ग.दि. माडगूळकर यांचे गीत  , ' तोरा मन दरपन ' हे शाहना कानडा मधील गीत सादर झाले. मधमाद सारंग रागावर आधारीत 'दुख भरे दीन ' , गौड मल्हार रागावर आधारीत बरसात की रात या चित्रपटातील 'गरजत बरसत ' ,खमाज रागातील मेडले ' दिल है छोटासा, ' बनके पंछी, ओ सजना,  पिया तोसे नयना, ' ही मेडले सादर झाली.

 खमाज रागातील ठुमरी बाज असलेले उपशास्त्रीय संगीतावर आधारीत नवरंग चित्रपटातील 'आ दिलसे ' , कव्वाली बाज असलेले ' ना तो कारवाँ की तलाश है ' , राग हंसध्वनी मधील परिवार चित्रपटातील  'जा तोसे नही ',  राग मालकंस मधील मराठी हिंदी चे मिश्रण असलेले निवडुंग चित्रपटातील 'ना मानोगे 'हे गीत , मालकंस रागामधील 'बडा आदमी ' चित्रपटातील 'अखियन संग अखियाँ ' ,  बहार , यमन या रागातील ' कुहू कुहू बोले कोयलिया' , 'दिल ही तो है 'या चित्रपटातील 'लागा चुनरी में दाग' या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम शनिवार, दि.४ मे    २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०५ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचे सत्कार केले.

 

 

 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती