सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 जिल्हा

पूर्व विभागात प्रचारात भाजपची आघाडी

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    06-05-2024 16:27:23

उरण :पिरकोन गावात व पूर्व विभागातील विविध गावात आमदार महेशशेठ बालदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गाव बैठक लावण्यात आली.सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त हे तन मन धन अर्पुन जोमाने कामाला लागले आहेत.माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड यांनी आपले अनमोल विचार मांडले.आमदार महेश बालदी हे उरणचे विकास पुरूष आहेत असे त्यांनी मत व्यक्त केले .उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांनी सांगीतले की आमदार महेशशेठ बालदी साहेबांचे उरण पुर्व विभागावर व पिरकोनवर अभूतपूर्व प्रेम आहे.प्राध्यापक रमाकांत गावंड यांनी अबकी बार ४०० पार,फिर एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य दिले.माजी सरपंच व विद्यमान सदस्य के.वाय यांनी पी.एम.कीसान योजनेबाबत माहीती दिली.नितिन गावंड यांनी मतदान प्रक्रियेत व्हाटसप  फेसबुकवर आपल्या पक्षातील कामाच्या पोस्ट कराव्या असे सुतोवाच केले.एकनाथ अण्णा यांनी आपले प्रखर विचार मांडले आणी नवतरूणानी पुढे यावे असे आवाहन केले.सर्व मान्यवरांनी दिलखुलास चर्चा केली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती