सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयास सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ..!

डिजिटल पुणे    09-05-2024 10:06:02

पुणे : इंडियन रेड क्रॉस सोसायटी  मार्फत  देण्यात येणारा शैक्षणिक वर्षे २०२३-२४ उत्कृष्ट युथ रेड क्रॉस युनिट महाविद्यालय म्हणून  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयास उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार नोशेर नानावटी करंडक देण्यात आला. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे जिल्हा चेअरमन विक्रम पाठक, प्राचार्य डॉ. संजय खरात, आर.व्ही कुलकर्णी, राजकुमार शहा, नेहा पेंडसे यांच्या हस्ते नोशेर नानावटी फिरता चषक व प्रमाणपत्र देणून सन्मानित करण्यात आले.

 युथ रेड क्रॉस युनिट मार्फत महाविद्यालयाने शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, निर्माल्य संकलन, गणेश विसर्जनामध्ये प्रथमोपचार कार्य, पोलीस मित्र म्हणून काम, दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक म्हणून काम, आपत्ती व्यवस्थापन जनजागृती राष्ट्रीय राज्यस्तरीय शिबिरांमध्ये  सहभाग घेत राज्याचे प्रतिनिधित्व केले तसेच पुणे शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला व उपक्रम राबविले याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युथ रेड क्रॉस काँन्सिलर व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक शेळके, काँन्सिलर व महिला कक्ष प्रमुख डॉ. रुपाली शेंडकर यांनी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. शोभा तितर,डॉ. प्रकाश हुंबाड,प्रा. गौरी मारणे, प्रा.प्रियांका जाधव, प्रा.अलका वाडेकर, विनोद रणपिसे, विद्यार्थी प्रतिनिधी यश चांडक, शोयब शेख, गीता कटारे, मयुर होमकर, सुरज शिराळे यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उपक्रम राबविले.उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी व इतर मान्यवर.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती