सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

महाराणा प्रताप यांची जयंती तर कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमीत्त धायरीतील एशियन कॉलेज ऑफ सायन्समध्ये कार्यक्रम संपन्न

डिजिटल पुणे    10-05-2024 11:36:56

पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. आणि  सर्व जातिधर्माच्या गोर-गरीब रयतेला शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६५ वी पुण्यतिथी गुरुवारी (दि. ९) पुण्यातील एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन रिसर्च पुणे संचालित एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स एशियन ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. या सोबतच आज महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त देखील एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये सर्वां कडून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाला मा. संस्थापक अध्यक्षा डॉ. अनिता साप्ते, संस्थापक उपाध्यक्ष आनंद साप्ते, संस्थेचे सचिव अनिल साप्ते, प्राचार्य डॉ. सविता सिंह, फार्मसीच्या प्राचार्या प्राप्ती देसाई, उप प्राचार्या श्रुती रेगे, कनिष्ठ उप प्राचार्या प्राजक्ता शिंदे तसेच एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी उपस्थिती होते. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सविता सिंह यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महाराष्ट्रातील सामाजिक कार्याविषयी आणि महाराणा प्रताप यांच्या युध्य कार्याविषयी माहिती दिली. 

कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. 'स्वावलंबनाने कष्ट करून शिका' हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले.  याचप्रकारे माहिती सांगून विद्यार्थी वर्गाला शिक्षणाविषयी व पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती