सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

दुःखद बातमी! मावळचे माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांचे निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गजानन मेनकुदळे    01-07-2025 10:35:56

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्याच्या मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, आज (1 जुलै) सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षणमहर्षी मावळ भूषण या उपाधींचा सार्थ मान मिळवलेले कृष्णराव भेगडे हे 1972 मध्ये मावळ विधानसभेतून जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. मग 1977ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते 1978ला पुन्हा विधानसभेवर निवडून आले होते. 2000 साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. विधानसभा आणि विधानपरिषद असं चार टर्म आमदार राहिलेले भेगडे राजकारणातून निृवृत्त झाले. मात्र अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले.

मावळच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी

दरम्यान, जनसंघापासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन वेळा विधानसभेवर मावळचे प्रतिनिधित्व केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले, विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये उघडले. त्यांच्या याच कार्यामुळे आणि लोकसेवेमुळे त्यांना शिक्षणमहर्षी, मावळ भूषण या उपाधींनी ही सन्मानित केल्या गेलं. तर आपल्या संयमी नेतृत्वामुळे आणि कार्यक्षमतेमुळे ते सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते. कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ‌ पक्षात त्यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली. तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदांवर कार्य करत त्यांनी स्थानिक प्रशासनात विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले. त्यांच्या निधनामुळे मावळच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.


 Give Feedback



 जाहिराती