न्यूयॉर्क : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १७ आगस्ट ला इंडीया डे परेड चे आयोजन न्युयॉर्क मध्ये झाले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला. परेड ग्रँड मार्शल चा मान जगप्रसिद्ध छावा ची अभिनेत्री रश्मीका मंदाना व अभिनेता विजय देवेरकोंडा यांना देण्यात आला. मिशीगन राज्याचे US हाऊस ऑफ रेप्रेसेंटेटीव्ह (खासदार) श्री श्री ठाणेदार ह्यांची पूर्णवेळ कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थिती. त्यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला अभिवादन केले तसेच परेड स्टेजवरून परेडचे निरीक्षण केले. 
न्यूयॉर्क शहराचे महापौर श्री एरिक आडम्स ह्यांनी परेडची सुरुवात केली. भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत श्री बिनया प्रधान ह्यांनी विशेषकरून छत्रपती फाऊंडेशन च्या किर्थिरथ दरवर्षीच दिमाखदार असतो पण त्यापेक्षाही त्यांचं कार्य जास्त दिमाखदार आहे असे गौरवोद्गार काढले.रथावर शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा व मावळ्यांची भूमिका सादर.. बालक, महिला व युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे ऐतिहासिक क्षण जिवंत केले. किर्तीरथासोबत जल्लोश ढोल ताशा पथकाच्या ५० हुन अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहर दुमदुमून टाकले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या बॉलीवूड नाट्य दिग्दर्शक संदेश रेड्डी ह्यांच्या रुद्र डान्स अकॅडमी च्या लहान मुलींनी लेझीमसह विविध नृत्य सादर केले.१०० हुन अधिक लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचे भव्य प्रदर्शन सातासमुद्रापार केले. महाराष्ट्रातील लोककलेचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतल्या लोकांना दिला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेड मधे मोठ्या उत्साहात सहभागी झाले प्रचंड उत्साहात हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोशात जगाची आर्थीक राजधानी न्यूयॉर्क मधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता.
New York Parade Life ह्या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तिरथाला "Best Float (रथ) " म्हणत शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळांशी जोडला आहे असे नमूद केले मुख्यतः विध्यार्थी व तरुणांच्या नेतृत्वात छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून न्यूयॉर्क मध्ये शिवजयंती, जिजाऊजयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंती च्या माध्यामातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन केले होते. फौंडेशनच्या वीवीध उपक्रमात या उपक्रमामुळे अजुन एक माणाचा तुरा खोवला गेला आहे.
फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स ह्या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन केल्या जातेकीर्तीरथाच्या भरदस्त आयोजनासाठी छत्रपती फाऊंडेशन च्या १० राज्यातून आलेल्या सदस्यांनी अपार मेहनत घेतली. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जल्लोश ढोल-ताशा पथक व रुद्र डान्स अकॅडमी ह्यांचे कौतुक केले.
छत्रपती फाउंडेशन, न्यूयॉर्क, अमेरिका
