सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान केलं, नाशिकमध्ये बड्या डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

वसुबारस म्हणजे कृतज्ञतेचा सण — गोवत्सद्वादशीचे पावन महत्त्व!

डिजिटल पुणे    17-10-2025 11:04:19

 वसुबारस महत्व

 दीपावली सणाला दीपावली, दिव्यांचा उत्सव, दीपोत्सव, दिवाळसण अशा नावांनीही ओळखले जाते.  दीपावली हा साधारण पाच दिवस साजरा केला जाणारा सण. या सणाची सुरुवात होते ती वसुबारसेपासून. म्हणूनच जाणून घेऊया दीपावली च्या सणामध्ये वसुबारसेचे महत्त्व काय आहे?_

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

दिवाळी सणाचा हा पहिलाच दिवस असल्याने अंगणात सडासंमार्जन, रांगोळी घातली जाते.

 खरे तर वसु बारस याचा साधा आणि सरळ सरळ अर्थ म्हणजे धनांची बारस.

वसु म्हणजे धन ज्याला आपण द्रव्य असेही म्हणतो आणि बारस म्हणजे द्वादशी. यावरुनच नाव पडले वसु बारस.

 या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखले जाते.

या सणामध्ये कृषीप्रधान भारताचे प्रतिबिंब पडल्याचे पहायला मिळते.

या दिवशी संध्याकाळी गाई आणि पाडसाची पूजा घरामध्ये धनधान्य, संपत्ती आणि लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी केली जाते. 

▫ज्यांच्या घरी गुरे, वासरे, गाई असतात ती मंडळी गाईची पूजा करतात. सोबत इतर गुरांनाही पुरणपोळीचा नैव्यद्य दाखवतात.

 गोमाता पूजनाने दिवाळीची सुरुवात, वसुबारस !

 महाराष्ट्रातल्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस.

आज गाय, बैल, म्हैस या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गाय-बैलांना न्हाऊ-माखू घालून छान सजवले जाते आणि मग त्यांचे औक्षण करून गोडधोड खायला दिले जाते.वसुबारस म्हणजे काय? : वसुबारसेला गोवत्सद्वादशी असेही म्हटले जाते. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून ही पूजा केली जाते.

 वे. श्री ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री ) सोलापूर.


 Give Feedback



 जाहिराती