उरण : शिवप्रतिष्ठान पुणे यांच्या तर्फे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार सोहळा आळंदी येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण तालुक्यातील पागोटे गावचे सुपुत्र उत्तम कलाकार, उत्तम सूत्रसंचालक विवेक चंद्रकांत पाटील यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
आळंदी पुणे येथे शिव प्रतिष्ठाण पुणे यांच्या वतीने मला श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे माझ्या कार्याचा बहुमान म्हणुन महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. असे मत विवेक पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केले.या वेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन रेनगडे पाटील व सिने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव तसेच छोटी गिर्यारोहक कु. अन्वही घाडगे (जागतिक गिर्यारोहक), डॉ. हेमंत वसेकर (पशु संवर्धन आयुक्त महाराष्ट्र), ह. भ. प. शास्त्री निळोबाराय महाराज थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच विवेक पाटील यांच्या समवेत धुतुम गावचे उरण व रायगड जिल्ह्यातील निवेदक सूत्रसंचालक समाजसेवक प्रकाश ठाकुर हे सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते
उरण तालुक्यातील पागोटे गावचे सुपुत्र विवेक पाटील हे उत्तम कलाकार, उत्तम सूत्रसंचालक असून ते उत्तम गायक, समाजसेवक सुद्धा आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक कार्यक्रम घेऊन समाजात जनजागृती केली आहे.विविध उपक्रम राबवून गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे.विवेक पाटील यांनी आजपर्यंत समाजासाठी केलेले कार्य, दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. विवेक पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.