सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
  • : पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
  • धक्कादायक! बंजारा आरक्षणाचा मुद्दा पेटला, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सरकार जबाबदार असल्याचा उल्लेख
  • : फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे...
  • मोठी बातमी, आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्राची मंजुरी, अश्विनी वैष्णव यांची माहिती
 जिल्हा

छठ महापर्व भारतीय संस्कृतीत अद्वितीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    28-10-2025 10:45:45

मुंबई : छठ महापर्व हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे पर्व शिस्तबद्धता, पवित्रता आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जुहू चौपाटी येथे छठ उत्सव महासंघ यांच्या वतीने आयोजित छठ महापर्व या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, संजय पांडेय, मोहन मिश्र, दिवाकर  मिश्र, विमल मिश्र बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छठ महापर्वच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छठ पर्वामध्ये प्रथम मावळत्या सूर्याला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते, जे आपल्या संस्कृतीतील नम्रता आणि उदारतेचे अद्भुत प्रतीक आहे. छठ महापर्व साठी २०१४ पासून महानगरपालिकेच्या वतीने विविध सुविधा देण्यात येत आहेत, अशाच अधिक सुविधा दरवर्षी  देण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी छठ उत्सव महासंघाच्यावतीने ‘सूर्य पथ’ या छठ पर्व विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती