मुंबई : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडील सुरक्षा कामगार यांच्या वेतनातील सुधारणा करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत सैनिक कल्याण विभागाने संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक बोलवावी अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे सुरक्षा कामगार यांच्या वेतनातील तफावतीबाबत आढावा बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यासह माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव पंकज कुमार, मेस्को, ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ यांचे सुरक्षा कामगार यांचा सुधारित वेतनाचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडला सादर करावा तसेच मेस्को व महाजनको तसेच संबधित अधिकारी यांची या निर्णयासाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
