सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
  • : पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
  • धक्कादायक! बंजारा आरक्षणाचा मुद्दा पेटला, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सरकार जबाबदार असल्याचा उल्लेख
  • : फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे...
  • मोठी बातमी, आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्राची मंजुरी, अश्विनी वैष्णव यांची माहिती
 DIGITAL PUNE NEWS

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी, कोणत्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला? जळगावात खळबळ!

डिजिटल पुणे    28-10-2025 17:10:58

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. ही घटना घटना ताजी असतानाच जळगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ५ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या अंगठ्या आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम लांबवली. खडसे दिवाळीनिमित्त बाहेरगावी असल्याने घर रिकामे होते. सुरक्षारक्षक सुट्टीवर असताना चोरट्यांनी कपाटे उचकून चोरी केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. दरम्यान आता खडसेंच्या घरी चोरीची घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

खडसे यांच्या जळगावमधील शिवराम नगर येथील मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून सहा ते सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला बंद होता. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

खडसेंनी स्वतः दिली चोरीच्या घटनेची माहिती; काय काय गेलं चोरीला?

माझ्या जळगाव शहरातील शिवम नगर भागात बंगला आहे त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त जो वाशिम होता तो बाहेरगावी गेलेला आहे आणि त्या घराला सध्या कुलूप होते मी देखील बाहेरगावी असल्याने त्या ठिकाणी साधारण काही माझ्या लॉकरमध्ये 35 हजार रुपये रोख रक्कम होती काही पाच पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या होत्या आणि असे काही सात ते आठ डोळे सोने त्या ठिकाणाहून चोरी करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिली

तसेच यावेळी त्यांनी पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत आहेत. दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. काहीतरी वेगळाच अर्थ करतात. घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशा शब्दात टीकास्त्र राज्य सरकरावर सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री बंगल्यााचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तळ मजला आणि पहिल्या मजल्यावरील खोल्यांतील कपाट फोडले. चोरट्यांनी किती किंमतीचे दागिने, वस्तू किंवा रोख रक्कम लंपास केली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. घटना घडली तेव्हा बंगल्या कोणीही नव्हते.घटनास्थळी जळगाव पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी बंगल्याातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही फुटेज तसेच परिसरातील संशयास्पद हालचालींची तपासणी सुरू केली आहे.

या पूर्वी पडला होता दरोडा...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची सून आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर चोरी झाली होती. आता एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुसऱ्यांदा खडसे कुटुंबाला टार्गेट केलं आहे.दरम्यान, 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. यामध्ये मुक्ताईनगर येथील रक्षा फ्युअल (केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप), कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद’ आणि तळवेल फाटा येथील ‘सय्यद पेट्रोल पंप’ या ठिकाणांचा समावेश होता.

 

 


 Give Feedback



 जाहिराती