सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
  • : पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
  • धक्कादायक! बंजारा आरक्षणाचा मुद्दा पेटला, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सरकार जबाबदार असल्याचा उल्लेख
  • : फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे...
  • मोठी बातमी, आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्राची मंजुरी, अश्विनी वैष्णव यांची माहिती
 शहर

जैन बोर्डिंग प्रकरणानंतर रविंद्र धंगेकरांची मॉडेल कॉलनीतील जैन होस्टेलला भावनिक भेट;भगवान महावीरांचे मनोभावे दर्शन

डिजिटल पुणे    28-10-2025 18:08:43

पुणे :  पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून तापलेले राजकीय वातावरण आता नव्या वळणावर आले आहे. शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची विक्री गोखले बिल्डर्सने केली होती. मात्र या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर रविवारी रात्री गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ई-मेलद्वारे जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली.

या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. गोखले बिल्डर्स आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. “या होस्टेलची एक वीट सुद्धा कोणाला हलवू देणार नाही,” असा शब्द धंगेकर यांनी पुणेकरांना आणि जैन समाजाला दिला होता.

रविवारी व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मॉडेल कॉलनीतील जैन होस्टेल येथे भेट देऊन भगवान महावीर आणि जैन मुनींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले, “मंत्रीपदाचा दबाव आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून करण्यात आलेला हा व्यवहार प्रचंड जनदबाव आणि जैन समाजाच्या एकतेमुळे अखेर रद्द झाला.”

मंत्रीपदाचा दबाव आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून करण्यात आलेला हा व्यवहार प्रचंड राजकीय दबावामुळे अखेर रद्द झाला. या संपूर्ण काळात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नको या हेतूने मी या हॉस्टेलच्या आवारात आलो नाही. परंतु काल जैन मुनींनी केलेल्या आवाहनाप्रमाणे आज येथे मनोभावे दर्शन घेतले. निश्चितच हा व्यवहार रद्द होण्याची घोषणा म्हणजे हा संघर्ष थांबला आहे असे मुळीच नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी या ठिकाणी भगवान महावीरांचे भव्य मंदिर उभे राहील आणि या वास्तूमध्ये पुन्हा एकदा मुलांसाठी सर्व सुविधानियुक्त होस्टेल सुरू होईल, त्याच दिवशी खरे या लढाईला यश आले असे मानले जाईल.

धंगेकर पुढे म्हणाले, “हा संघर्ष इथे थांबलेला नाही. या ठिकाणी भगवान महावीरांचे भव्य मंदिर उभे राहील आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांसह होस्टेल सुरू होईल, त्या दिवशीच या लढाईला खऱ्या अर्थाने यश मिळालं असं म्हणता येईल.”या घडामोडींनंतर पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चैतन्यशील झाले असून, जैन समाजाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती