सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं
 शहर

फिनिक्स फाऊंडेशन, पुणे’चा समाजोपयोगी उपक्रम — रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गजानन मेनकुदळे    29-10-2025 12:54:47

पुणे : पुणे शहरात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याचा विचार करून, तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत सौ. मेधा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘द फिनिक्स फाऊंडेशन, पुणे’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. यामिनी अमोल मठकरी यांनी केले.

रक्तदान शिबिरास पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान आयुष्मान भारत योजना अभियानांतर्गत गरजू नागरिकांना या योजनेची कार्डे वितरित करण्यात आली. रक्तदाते आणि आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात सौ. यामिनी मठकरी यांच्यासह श्री. जयेश शर्मा, सौ. सोनाली येणपुरे, श्री. कमलेश कोंढाळकर, श्री. लखीचंद शर्मा, सौ. पूजा देशमुख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. संदीप सांगळे, श्री. बाळकृष्ण नेहरकर, श्री. मंदार रेडे, सौ. मनिषा लडकत, श्री. मिलिंद एकबोटे, श्री. शाम देशपांडे, सौ. माधुरी सहस्त्रबुद्धे, श्री. जयंत भावे, सौ. अनिता तलाठी, सौ. जान्हवी जोशी, ॲड. सुरेखा डाबी तसेच ‘नवचैतन्य हास्य क्लब’चे पदाधिकारी, रक्तदाते आणि नागरिक उपस्थित होते.

समाजभान जपत, मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. “रक्तदान म्हणजे जीवनदान,” हा संदेश देत ‘फिनिक्स फाऊंडेशन’ने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

 

 

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती