सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, अजित पवारांची बारामतीत पॉवरफुल खेळी
  • मोठी बातमी! निवडणुकांच्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी; हायकोर्टाने मतदार यादीसंदर्भातील चारही याचिका फेटाळल्या
  • मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
  • मोठी बातमी : ZP, मनपा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची चिन्हं, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
  • आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला', Rohit Arya प्रकरणी पोलिसांचा दावा
  • पुण्यात एकाच खोलीत राहणारे सगळे मित्र झाले सरकारी अधिकारी, कराडच्या सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड
  • : बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
 विश्लेषण

मोठं बातमी: ZP, मनपा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता! राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद; आचारसंहिता लागू होणार?

डिजिटल पुणे    04-11-2025 11:31:06

मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकता आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत. याशिवाय आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त  दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्येच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर तत्काळ राज्यात आचारसंहिता लागू होईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा  मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.

राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.  

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आज आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, त्यात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं दिसत आहेत.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता आहे.

 पहिला टप्पा – 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती

 दुसरा टप्पा – जिल्हा परिषद व पंचायत समित्या

 तिसरा टप्पा – महापालिका निवडणुका

नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता असून, मंगळवारीच निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे.

या निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण

289 नगरपालिका,

32 जिल्हा परिषदा,

331 पंचायत समित्या आणि

 29 महानगरपालिका

यांचा समावेश असणार आहे.

 राज्याचे लक्ष आता आजच्या दुपारच्या पत्रकार परिषदेकडे केंद्रित झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती