सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 शहर

रावेत पोलीस स्टेशन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

डिजिटल पुणे    04-11-2025 11:59:34

चिंचवड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ना.मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मावळचे महासंसदरत्न खासदार मा.श्री. श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना उपनेत्या सौ. सुलभाताई उबाळे आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कु. विश्वजितजी बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सागर दत्तात्रय पाचर्णे व युवासेना चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख कु. सागर एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने रावेत पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमात ए.सी.पी. विठ्ठल कुबडे साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फटांगरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख श्री. निलेशजी तरस, युवासेना लोकसभा प्रमुख श्री. राजेंद्रजी तरस, महिला जिल्हाप्रमुख श्री. शिलाताई भोंडवे, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सागर दत्तात्रय पाचर्णे, युवासेना चिंचवड उपशहरप्रमुख कु. सागर एकनाथ शिंदे, चिंचवड विधानसभा वैद्यकीय कक्ष प्रमुख सौं. सुप्रिया कवडे व युवासेना कॉलेज कक्ष सरचिटणीस कु. ह्रिषीकेश जोशी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती