उरण : सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक घ्याव्यात असे आदेश महाराष्ट्र शासनाला दिल्याने शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )या महायुती तर्फे निवडणुका संदर्भात बैठका,गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना( शिंदे गट) तर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील संघटना बांधणीला, मोर्चा बांधणीला व बैठकीला सुरुवात झाली आहे.रायगड जिल्ह्यात उरण विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष अतुल भगत हे प्रत्येक विभागात फिरून पदाधिकारी कार्यकर्त्याचे भावना, मते,विचार जाणून घेत आहेत. बैठका घेऊन जनतेच्या विविध समस्या प्रश्न जाणून घेत आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथे शिवसेना जिल्हा परिषद चिरनेर गटाचे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी चिरनेर जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुका प्रमुख दिपक ठाकूर, जिल्हा संघटक महेंद्र पाटिल, शहर प्रमुख सुलेमान शेख, शिवसेना जिल्हा समन्वयक मनोहर ठाकूर,उरण विधानसभा अल्पसंख्यांक सेल संघटक समद भोंगले, वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष दशरथ चव्हाण, उरण तालुका सह संपर्क प्रमुख प्रितम पाटिल व इतर पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेतर्फे पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे करण्याचे आवाहन अतूल भगत यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.आपापसातील मतभेद विसरून शिवसेना पक्षाचे एक निष्ठेने प्रामाणिकपणे काम करा.आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते सोळा सोळा तास काम करतात व आपण निदान पाच ते सहा तास तरी संघटनेसाठी, पक्षासाठी दिले पाहिजेत असे मत शिवसेना तालुकाप्रमुख दीपक ठाकूर यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिरनेर गटा तर्फे आयोजक सचिन पाटील, विजय पाटील, संजय पाटील, शाखाप्रमुख हिंमत केणी,उपशाखाप्रमुख अजित केणी, दीपक चव्हाण यांनी विशेष घेतली. या सर्वांचे जिल्हाप्रमुख अध्यक्ष अतुल भगत यांनी आभार मानले.