सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, अजित पवारांची बारामतीत पॉवरफुल खेळी
  • मोठी बातमी! निवडणुकांच्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी; हायकोर्टाने मतदार यादीसंदर्भातील चारही याचिका फेटाळल्या
  • मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
  • मोठी बातमी : ZP, मनपा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची चिन्हं, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
  • आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला', Rohit Arya प्रकरणी पोलिसांचा दावा
  • पुण्यात एकाच खोलीत राहणारे सगळे मित्र झाले सरकारी अधिकारी, कराडच्या सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड
  • : बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
 विश्लेषण

मोठी बातमी : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर;मतदान 2 डिसेंबरला, निकाल 3 डिसेंबरला; आजपासून आचारसंहिता लागू

डिजिटल पुणे    04-11-2025 16:44:00

मुंबई: – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 

राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामधून 6859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. 15 नवीन नगरपंचायत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. 147 नगरपंचायती आहेत, त्यातील 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.  27 नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम केल्या जातील. मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार अशी माहिती देण्यात आली. 13 हजार 355  मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. ईव्हीएमने निवडणुका होणार आहेत. तसंच जात वैध प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याचा अवधी असेल. मतदारांना मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, यादीतील नाव, उमेदवाराची माहिती मिळेल. उमेदवारांविषयीची माहितीही अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. 

 

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात येणार असून, त्यासाठी आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे.राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

 निवडणुकीचे वेळापत्रक:

नामनिर्देशन दाखल: 10 नोव्हेंबर

अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर

छाननी: 18 नोव्हेंबर

अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर

मतदान: 2 डिसेंबर

निकाल जाहीर: 3 डिसेंबर

महत्वाची आकडेवारी:

एकूण मतदार: 1,07,03,576

कन्ट्रोल युनिट्स: 13,000

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध: 31 ऑक्टोबर

 विभागनिहाय निवडणुका:

कोकण – 17

नाशिक – 49

पुणे – 60

संभाजीनगर – 52

अमरावती – 45

नागपूर – 55

 उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ:

यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

अ वर्ग नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा : ₹15 लाख

क वर्ग नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा : ₹7 लाख

 मतदारांसाठी नवीन अॅप:

मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅप विकसित करण्यात आले आहे. दुबार मतदान टाळण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून, संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवण्यात आले आहे. अशा मतदारांकडून विशेष डिक्लरेशन घेतले जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती