सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, अजित पवारांची बारामतीत पॉवरफुल खेळी
  • मोठी बातमी! निवडणुकांच्या अनुषंगाने न्यायालयात सुनावणी; हायकोर्टाने मतदार यादीसंदर्भातील चारही याचिका फेटाळल्या
  • मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
  • मोठी बातमी : ZP, मनपा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची चिन्हं, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
  • आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला', Rohit Arya प्रकरणी पोलिसांचा दावा
  • पुण्यात एकाच खोलीत राहणारे सगळे मित्र झाले सरकारी अधिकारी, कराडच्या सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड
  • : बिबट्याला जगवायचं की माणसाला, ते ठरवा! गावकऱ्यांचा राज्य सरकाला अल्टिमेटम, मंत्रालयात महत्त्वाची बैठक
 जिल्हा

हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांना शासनाची मान्यता

डिजिटल पुणे    04-11-2025 17:17:35

मुंबई :  पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी 5 हजार 704 कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती