सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप, आता देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणाची माहिती मागवली; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
 शहर

राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचणार अपूर्णांकांचे पाढे

डिजिटल पुणे    06-11-2025 15:42:39

पुणे : अपूर्णांकांचे पाढे हे भारतीय गणिताचे अनमोल वैशिष्ट्य आहे. शालेय अभ्यासक्रमात अपूर्णांकांची उदाहरणे असली, तरी अपूर्णांकांचे पाढे शिकवले जात नाहीत. अपूर्णांकांच्या पाढ्यांची उपयुक्तता आणि महत्त्व लक्षात घेता, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशनस् यांनी एकत्रितपणे ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर  अपूर्णांकांचे पाढे पोचणार आहेत ! आगामी शैक्षणिक वर्षात ही स्पर्धा सुरु होणार आहे.डॉ. शामकांत देवरे ( संचालक : राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य )  आणि  मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी ही माहिती  पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निर्मिती नामजोशी, गणित संशोधक लक्ष्मण गोगावले उपस्थित होते.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे सहा नोव्हेंबर रोजी दुपारी ही पत्रकार परिषद झाली. गणित हा सर्व शास्त्रांचा पाया मानला जातो. तरीसुद्धा आजही शालेय स्तरावर सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती आढळते. विद्यार्थ्यांची ही भीती कमी करून गणिताशी त्यांची मैत्री व्हावी, या हेतूने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.या उद्देशाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स ने राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांना प्रस्ताव सादर केला. संस्थेने या उपक्रमाची दखल घेत, राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत गणित सुलभतेने पोहोचावे, यासाठी मॅप एपिक कम्युनिकेशन्स सोबत सहकार्य केले.

अपूर्णांकांचे पाढे हे भारतीय गणिताचे अनमोल वैशिष्ट्य आहे. शालेय अभ्यासक्रमात अपूर्णांकांची उदाहरणे असली, तरी अपूर्णांकांचे पाढे शिकवले जात नाहीत. अपूर्णांकांच्या पाढ्यांची उपयुक्तता आणि महत्त्व लक्षात घेता, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांनी एकत्रितपणे ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला.गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून आजवर १,५०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. 

विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी शासनाकडून कोणताही आर्थिक भार पडलेला नाही; सर्व खर्च मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांनी केला आहे.अपूर्णांकांचे पाढे हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. पिढ्यान पिढ्या संध्याकाळी पाढे म्हणण्याची परंपरा होती. त्या परंपरेचा लोप झाल्यामुळे भाषिक गणिताची पकड कमी झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती निर्माण झाली. ‘पाढे सात्मिकरण’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उजवा मेंदू सक्रिय होतो आणि त्यांच्यात तार्किक विचारशक्ती विकसित होते, ज्याचा त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.सद्यस्थितीत ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली जाते. मात्र आज मॅप एपिक कम्युनिकेशनस् प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग यांच्या वतीने अभिमानाने घोषणा करण्यात येते की, ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ आता राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.हा उपक्रम केवळ गणित शिकविण्याचा नव्हे, तर गणिताशी विद्यार्थ्यांची नाळ जुळविण्याचा प्रयत्न आहे,असेही यावेळी सांगण्यात आले. 

अपूर्णांकांचे पाढे

अपूर्णांकांचे पाढे म्हणजे पूर्णांक नसलेल्या अपूर्णांकांच्या गुणाकारांचे पाढे. हे पाढे गणित सोपे करण्यासाठी तयार केले आहेत आणि त्यात 'पाव', 'निम्मे', 'पाऊण', 'सव्वा', 'दिड' आणि 'अडीच' अशा अपूर्णांकांचा समावेश आहे. यामुळे गणितातील क्रिया जलद होतात, कारण हे पाढे पाठ करण्याऐवजी ऐकून लक्षात ठेवता येतात. 


 Give Feedback



 जाहिराती