दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू, तर 24 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि नागपूरमधील संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय परिसराला तिहेरी स्वरुपाच्या सुरक्षा घेरा घालण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईतही रेल्वे स्थानकांवर डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली जात आहे आणि संशयित व्यक्तींची चौकशी होत आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त
सगळ्या पुणेकरांचं श्रधस्थान असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनाला येतात आणि जया वेळी दिल्लीसारख्या स्फोटाच्या घटना घडतात त्यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराला मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात येते. BDDS पथकाच्या आझाद नावाच्या कुत्र्याने आधी दगडूशेठ गणपती समोर नथमस्थक झाला आणि नंतर संपूर्ण मंदिराची पाहणी केली.
दिल्ली येथे काल सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी करून आज सोडण्यात येत आहे तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहे.
मुंबईतील CSMT वर कडक बंदोबस्त, RPF जवानांकडून प्रवाशांची कसून तपासणी
'दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस असू देत किंवा महाराष्ट्रमध्ये सर्व ठिकाणी आता पोलीस हे सतर्क झाले आहेत'. संपूर्ण रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली जात असून, विशेषतः दुसऱ्या राज्यांमध्ये जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले आहे. RPF चे जवान मेटल डिटेक्टर आणि श्वान पथकाच्या मदतीने प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करत आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल. मुंबईतील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील धार्मिक स्थळांनाही विशेष अलर्ट
राज्यातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेगाव: संत गजानन महाराज मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जात आहे.
इतर जिल्हे: गर्दीच्या ठिकाणी शस्त्रसज्ज पोलीस आणि शीघ्रकृतिदल तैनात.
संपूर्ण राज्यात सतर्कता
महाराष्ट्रातील पोलीस दल, रेल्वे सुरक्षा बल (RPF), आणि नागरी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांना संशयास्पद वस्तू वा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.